शांतीच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांना साद घालणाऱ्या नर्मदा परिक्रमेचे अचंबित करणारे अनुभव साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध करणारे लेखक जगन्नाथ कुंटे, तथा स्वामी अवधूतानंद यांच्या निधनाने, अध्यात्माच्या वाटेवरील एक अवलिया काळाच्या पडद्याआड गेला आहे. 'नर्मदे हर हर' या पुस्तकामुळे प्रकाशात आलेले कुंटे यांनी एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा खडतर नर्मदा परिक्रमा केली. आसक्ती-वासनांचा त्याग करून शांतीच्या शोधातील या यात्रेकरूने आध्यात्मिक लेखनाची वेगळीच शैली विकसित केली. त्यांचा जन्म कऱ्हाडमधील. आध्यात्माची ओढ लहानपणापासूनची. कतारमधील 'गल्फ टाइम्स'मध्ये काही वर्षे नोकरी करून मायभूमीत परतल्यानंतर